Pune News : आर्थिक वादातून भागीदाराच्या कार्यालयास आग लावून आत्महत्येचा प्रयत्न

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : आर्थिक कारणावरुन बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद होऊन एकाने भागीदाराच्या कर्मचा-याना मारहाण करीत कार्यालयाची जाळपोळ केली. त्यानंतर  स्वत: पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता धनकवडीत घडली.

हसमुख बाबूलाल जैन ( रा. ईशा पैलेस, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत मीठालाल नागोरी (वय 61, रा. गंगा ईशान्य सोसायटी,  धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  जैन व नागोरी यांच्यासह अन्य भागीदारानी 2006 मध्ये ईशा ग्रुप कंपनी सुरु केली होती. त्यामध्ये जैन व स्वर्णसिंग सोहल हे 2014 पासून संचालक होते. 2014 मध्ये जैन यांनी ईशा ग्रुप कंपनीमधील ईशा स्ट्रक्चर्स कंपनीतील राजीनामा दिला. त्यानंतर भागीदाराचा वाद न्यायालयात गेला.

नागोरी आणि  जैन यांच्यात पूर्वीचे आर्थिक व्यवहारासह इतर कारणांवरून वाद सुरु होते. त्यामुळे  काल दुपारी जैन नागोरी यांच्या शंकर महाराज मठाजवळच्या गंगा नक्षत्र प्रकल्पमधील कार्यालयात गेले. तेथे त्यांनी कार्यालयातील कर्मचा-याना दमदाटी करुन बाहेर काढले. कार्यालय आतुन बंद करुन कार्यालयाची तोडफोड करीत आग लावुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.