Charholi News : पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रदीप पंढरीनाथ बुडे (वय 35), योगेश देशमुख (वय 35, दोघे रा. बुडेवस्ती, च-होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत परमेश्वर लक्ष्मण केदार (वय 40, रा. च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडेवस्ती, च-होली येथे नवीन पुलाचे काम सुरु आहे. पुलाच्या कामासाठी बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. फिर्यादी केदार हे त्या बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी (दि. 4) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी प्रदीप आणि योगेश यांनी पुलाच्या बांधकामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ग्रील चोरून नेताना फिर्यादी यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.