Pimpri : शहरात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – एटीएम फोडून रोकड लांबवणाऱ्या टोळक्याने शहरात उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी (दि.22) शहरात पिंपरी आणि देहूरोड या दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले आहे.

पिंपरी येथे खराळवाडी परिसरात कॅनरा बँकेचे एटीएम केंद्र आहे. चोरटयांनी बुधवारी रात्री एटीएम केंद्रात प्रवेश करून मशीन दगडाने फोडून उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील रक्कम काढण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर चोरटयांनी एटीएम केंद्राचे शटर लावून पोबारा केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

देहूगाव येथे एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात चोरटे घुसले. पैसे बाहेर येणारा भाग (कॅश डिस्पेन्सर) फोडून बाहेर ओडून काढला. मात्र त्यातून त्यांना पैसे काढता आले नाहीत. यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व चोरटयांनी पळ काढला. नागरिकांनी याबाबत देहूरोड पोलिसांना कळवले. रक्कम चोरीला न गेल्याने बँकेच्या प्रतिनिधींनी याबाबत फिर्याद दिली नाही. त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.