Sangvi : पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप उघडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 23) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

गोपाळ वासूदेव देवळे (वय 43, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाळ यांचा भाऊ पिंपळे सौदागर येथील हर्षदा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. शुक्रवारी पहाटे पावणे चार ते सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या भावाच्या फ्लॅटचे कुलूप उघडून चोरीचा प्रयत्न केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.