BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : एटीएम चोरीच्या प्रयत्नात अडीच लाखांचे नुकसान; अज्ञातांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – चाकण जवळ म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये एटीएम मशीन, कॅमेरे असे एकूण अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 12) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडला.

नवनाथ उत्तम कणसे (वय 37, रा. दिघी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ म्हाळुंगे येथे कुमार कंपनीजवळ अॅक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. बुधवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मशीन चोरून नेत असताना चोरट्यांना नागरिकांच्या येण्याची चाहूल लागल्याने चोरटे एटीएम जागेवर सोडून पळून गेले. त्यामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला आहे. दरम्यान, या घटनेत एटीएम आणि कॅमेरे यांचे एकूण अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like