Hinjawadi : नेरे दत्तवाडीत एटीएम चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील नेरे दत्तवाडी येथे एटीएम सेंटरमधील कॅमेरा आणि एटीएमची तोडफोड करून मशीन चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथील आयएमएस कॉलेज समोर उघडकीस आली.

बँकेचे व्यवस्थापक गौरव रमाकांत तिवारी (वय 37, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी येथील आयएमएस कॉलेज समोर सूर्योदय बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी रात्री सात ते गुरुवारी सकाळी नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटरमधील कॅमेरा आणि एटीएमची तोडफोड केली. तसेच एटीएम चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत व्यवस्थापक तिवारी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.