Atul Pardeshi : अतुल परदेशी यांचा ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’ पुरस्कार देऊन सन्मान

एमपीसी न्यूज : मराठवाडा सेवक प्रतिष्ठान (Atul Pardeshi) पुणे या संस्थेच्या वतीने 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Dighi : सुरक्षारक्षकाने बाहेर काढले म्हणून केले कोयत्याने वार

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे (Atul Pardeshi) सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक अतुल परदेशी यांना पत्रकारितेतील मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संगीतकार रविंद्र घांगुर्डे, पंडित सुहासजी व्यास किशोर सरपोतदार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.