Maval : डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑटोमोबाईल कारचे अनावरण

गोव्यात होणाऱ्या मेगा ए टीवी चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत होणार सहभागी

एमपीसी न्यूज- गोवा येथे दि 18 ते 20 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मेगा ATV(ऑल टेरेन व्हेईकल) चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस मधील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑटोमोबाईल कारच्या अनावरणाचा कार्यक्रम आंबी येथे पार पडला.

या ऑटोमोबाईल कारचे अनावरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे विशेष अधिकारी प्रा. ललित पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून बनविलेली ही ऑटोमोबाईल कार गोवा येथे होणाऱ्या ATV चॅम्पियनशिप 2019 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.

डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. विजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने विद्यार्थ्यांनी या कारची निर्मिती केलेली आहे. या प्रसंगी डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस येथील प्राचार्य डॉ अभय पवार, प्राचार्य डॉ लक्ष्मण कांबळे, प्राचार्य डॉ राजेश खेर्डे, उपप्राचार्य डॉ प्रकाश पाटील, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भवानराव गायकवाड आणि रजिस्ट्रार अशोक पाटील उपस्थित होते.

विभागप्रमुख डॉ शैलेश चन्नपट्टणा, प्रा प्रशांत झावरे, प्रा दिलीप देशमुख आणि मेकॅनिकल विभागातील इतर प्राध्यापकांनी या कारच्या निर्मितीसाठी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.