Atypical Advantage : पुण्यातील ऑटिझम असलेल्या 19 वर्षीय कलाकाराने ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या सन्मानार्थ आपल्या स्वातंत्र्याचे स्वप्न रंगवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील 19 वर्षीय देवांश (Atypical Advantage) आपल्या कलेने सर्वांच्या मनात रंग भरत आहे. देवांश मौर्य हा 19 वर्षांचा कलाकार आहे. तो दोन वर्षांचा असताना त्याला गंभीर ऑटिझमचे निदान झाले होते. त्यामुळे त्याच्या आईने त्याला घरीच शिक्षण दिले. त्यावेळी तिच्या लक्षात आले, कि देवांशला रंग आणि चित्रकलेत हातोटी आहे. अलीकडेच, त्यांची कलाकृती जिनिव्हा सेंटर फॉर ऑटिझम, व्हर्च्युअल सिम्पोजियम 2020 येथे प्रदर्शित करण्यात आली. त्याला त्याच्या कलाकृतीमध्ये अत्यंत समाधान आणि विसावा मिळत असल्याचे देवांश याने सांगितले.

अॅटिपिकल फाऊंडेशन आणि पेपरफ्राय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, जम्मू, कोलकाता, मुंबई, पुणे अशा 12 हुन अधिक शहरांतील 30 अपंग कलाकारांनी चित्रकला कला सादर करण्यासाठी पेपरफ्राय स्टुडिओच्या दर्शनी भागाचा रिक्त कॅनव्हास म्हणून वापर केला.

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, लोकोमोटर डिसअॅबिलिटी, श्रवण कमजोरी, स्पिना बिफिडा, डाउन सिंड्रोम आणि बरेच आजार आणि अपंगत्व असलेल्या कलाकारांनी यात सहभाग घेतला. दिव्यांग कलाकारांना स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार देऊन त्यांना कलाकार म्हणून स्वत:ला हातभार लावावा, ही या मागची मुख्य कल्पना होती. Atypical Advantage हे अपंग लोकांसाठी आर्थिक उपजीविका निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठे समावेशक व्यासपीठ आहे. संस्था PWD ला MNCs मध्ये नोकऱ्या मिळवून देण्यास मदत करते.

Atypical Advantage चे संस्थापक आणि CEO विनीत सरायवाला म्हणतात, “या स्वातंत्र्यदिनी आमच्या कलाकारांनी जादू निर्माण करताना पाहून आम्ही रोमांचित आणि उत्साहित आहोत. हा मेगा इव्हेंट एक मजबूत संदेश देईल, की विविधता, समावेश आणि समानता प्रामाणिक प्रयत्नांनी साध्य केली जाऊ शकते. “आम्ही Pepperfry Studios चे आभार मानतो, की त्यांनी कलाकारांवर विश्वास ठेवला आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी इतके मोठे व्यासपीठ (Atypical Advantage) दिले.

Right Step Foundation : राईट स्टेप फाऊंडेशन देत आहे व्यसनाधिंनांना नवसंजीवनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.