BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गुन्ह्यात जप्त वाहनांचा बुधवारी जाहीर लिलाव 

एमपीसी न्यूज – दत्तवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव बुधवारी (दि.22) करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या लिलावात  15 मोटारसायकल, एक तीन आसनी रिक्षा, एक पॅगो रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. तर वाहनांसह 4 मोबाईल हॅण्डसेटचा देखील लिलाव करण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2