Aundh : गणपती आणि महालक्ष्मीच्या ‘शुभश्री’ चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज: गणेशोत्सवानिमित्त पी. एन. गाडगीळ अँड सन्स आणि शुभांगी गाडे यांच्या वतीने औंध येथे गणपती आणि महालक्ष्मीच्या चित्रांचे ‘शुभश्री’ नावाने प्रदर्शन आयोजित केले असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  पी. एन. गाडगीळ अँड सन्स, वेस्टएन्ड सेंटर १, रिलायन्स मार्टच्या पुढे , औंध, पुणे – ४११००७ येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आनंद पिंपळकर आणि विशेष पाहुणे घनःश्याम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन १० सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात गणपती आणि महालक्ष्मीची वेगवेगळी चित्रे पाहायला मिळत आहेत.  शुभांगी गाडे यांनी ही चित्रे रेखाटली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.