Aundh : बच्चे कंपनींच्या फॅशन शोमध्ये अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक

एमपीसी न्यूज- मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच लहानपणीच ‘स्टेज फीयर’ नाहीसे होऊन व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरता यावे या उद्देशाने किड्समंच आणि ‘माय पपेट स्टोरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किड्स फॅशन शो’ आयोजित करण्यात आला. औंध येथील वेस्टेंड मॉल येथे झालेल्या कार्यक्रमात बच्चे कंपनींच्या फॅशन शोमध्ये अभिनेता अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक केला.

कार्यक्रमाची सुरवात बाल कलाकार जीजा परांजपे हिच्या फ्युजन नृत्याने झाली. वय वर्षे अडीच ते नऊ अशा विविध वयोगटातील तब्बल 65 मुलामुलींनी देशी, विदेशी, फ्युजन प्रकारातल्या पेहेरावात बहारदार रॅम्पवॉक करुन प्रेक्षकांना अचंबित केले. ऐटीत डौलदार पावलं टाकत प्रेक्षकांकडे पाहून स्मितहास्य करत वेगवेगळ्या ‘पोज’ देणाऱ्या या बालचमुंचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रम ऐन बहरात असतानाच स्टेजवरून अभिनेता अंकुश चौधरीने एंट्री घेत मुलांबरोबर रॅम्पवॉक करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.

योगजा कुलकर्णी यांनी मुलांसाठी विविध प्रकारच्या पोषखांची जबाबदारी स्वीकारली होती. वैदेही पर्वतीकर, सोनल दाते, नेहा कुडाळकर आणि प्रतीक्षा देशमुख यांनी गेले दोन महिने मुलांकडून रॅम्पवॉक चा तसाच पेहेराव स्टेज वर कसा ‘कॅरी’ करायचा याचा सराव करुन घेतला होता. कार्यक्रमाचे आयोजन सत्यजित जोगळेकर आणि निवेदन प्रतीक्षा देशमुख यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.