Aundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज -औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अँड. राम कांडगे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ.सुहास निंबाळकर, डॉ.संजय नगरकर प्रा.बी.एस.पाटील, प्रा.एकनाथ झावरे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भगीरथ शिंदे यांनी पदवी ग्रहण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करून, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांमध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत सुरू झालेले शॉर्टटर्म कोर्स हे एकप्रकारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या कमवा-शिका योजनेचाच एक भाग आहे, असे मत व्यक्त केले.

  • अँड. राम कांडगे म्हणाले की, आई-वडील आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शैक्षणिक गुणवत्ता मिळऊन, आयुष्यात यशस्वी व्हावे. याप्रसंगी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. रयत शिक्षण संस्थेच्या विकासात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोलाची भूमिका अदा केल्याचे त्यांनी सांगितले.

रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शॉर्टटर्म कोर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने महाविद्यालयात कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत 35 ते 36 शॉर्टटर्म कोर्स चालविले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि त्या माध्यमातून त्याला नाविन्यपूर्ण गोष्टी बनविता याव्यात. अशा हेतूने हे शॉर्टटर्म कोर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे,असे मत व्यक्त केले.

  • महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंजुश्री बोबडे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार परीक्षा विभाग प्रमुख डॉ. तानाजी हातेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.