Aundh : ‘मुट कोर्ट’द्वारे न्यायालायच्या कामकाजाची दिली माहिती

एमपीसी न्यूज – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आणि यूजीसीच्या सौजन्याने ‘हुमान राईट सर्टिफिकेट कोर्स’ चालविला जातो. त्याअंतर्गत ‘मुट कोर्ट’ हा उपक्रम घेण्यात आला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोर्टाचे कामकाज कसे चालते. त्याचप्रमाणे कोर्टात वादी आणि प्रतिवादी यांच्या बाजू कशापद्धतीने मांडल्या जातात. याची माहिती मिळावी, म्हणून हा उपक्रम घेण्यात आला आहे. या कोर्ससाठी अँड. रोहित सुर्वसे, रोहित लेले, अँड. मनिषा बिट्रो यांनी न्यायाधीशाची भूमिका पार पडली.

यावेळी अँड.मयुरा बोर्डे, अँड.हर्षवर्धन लोणकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोर्टाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास सदाफळ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार आय. क्यू. ए. सी. चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी प्रा.सुप्रिया पवार, डॉ.संजय नगरकर, डॉ.तानाजी हातेकर, प्रा.एकनाथ झावरे, प्रा.मयुर माळी, डॉ.अतुल चौरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.