Aundh Crime News: औंध खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून औंधमधील भरवस्तीत पोलिस कर्मचाऱ्याच्या लहान भावावर कुऱ्हाडीने वार करून काल खून करण्यात आला होता.  त्यानंतर आज काही जणांनी आरोपीच्या भावावर वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे औंधमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

प्रशांत दिलीप दीक्षित (वय 22) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

क्षितिज कांताराम वैरागर (वय 21, रा. औंध) असे काल खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु: शृंगी पोलिसांनी अनिकेत दिलीप दीक्षित (वय 23, रा. बॉडीगेट पोलीस लाईन, औन्ध) याला अटक केली आहे. प्रशांत हा अनिकेतचा लहान भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून  काल क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला आहे. त्यानंतर आज क्षितिजवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्याच्या काही मित्राकडून आरोपीचा भाऊ प्रशांतवर वार करण्यात आले आहेत.  त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.