Aundh crime news : चोरट्यांची हिम्मत वाढली, कार समोर दुचाकी आडवी लावून तरुणाला लुबाडले

एमपीसीन्यूज : पुण्यात मागील काही दिवसांपासून स्ट्रीट क्राइम वाढला आहे. चोरट्यांची हिम्मत वाढली असून दिवसा ढवळा लुबाडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. औंध परिसरातूनही एक असा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री एका तरुणाच्या कार समोर तिघा जणांनी दुचाकी आडवी लावली व त्याच्या जवळील दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाने चतु:शृंगी स्टेशन मध्ये फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे गुरुवारी रात्री औंध मधील सानेवाडी येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली. तसेच त्यांचा रस्ता अडवून त्यांना “तू शिवतारेच ना, तू माझ्या बहिणीची छेड काढली आहे” असे म्हणत त्यांना मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा खिशातील सॅमसंग मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.