Aundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विश्वकोश दर्शन

एमपीसी न्यूज – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभागांतर्गत ‘विश्वकोश दर्शन’ मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे  सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, अनेक विदयार्थ्यांना विश्वकोश म्हणजे काय. हे माहीत नसल्यामुळे त्याचे वाचन करता येत नाही. त्यामुळे विश्वकोश म्हणजे काय, ते कशासाठी पहावेत, ते आल्फाबेटीकली कसे पहाता येतात. हे जर विदयार्थ्यांना कळाले तर विद्यार्थी विश्वकोश पहातील – वाचतील. त्यामुळे विदयार्थ्यांना जगाचे ज्ञान होईल. विश्वकोशाचे खंड आता डीव्हीडी स्वरूपात सुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच आपण गूगलवरतीसुद्धा  सर्व विश्वकोश पाहू शकतो. एवढच नव्हे तर आपल्या अँड्रॉईड मोबाईलवरती पण आपण विश्वकोश पाहू शकतो.  याचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाच्या सन्मानीय प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारचे विश्वकोश उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ते पाहता यावेत. तसेच विश्वकोशामधील माहिती कशा पद्धतीने पहावी.  हे विद्यार्थ्यांना कळावे. अशा हेतूने हा उपक्रम मराठी विभागाच्या माध्यमातून  घेण्यात आलेला आहे.

महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर हे  विश्वकोश खुल्या स्वरुपात ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर यांनी लिहिलेली  ‘महाराष्ट्रातील विस्तापित आणि मराठी कादंबरी’ तसेच  ‘मराठी कादंबरीची  शोकांतिका’  (साहित्य परिषदेचा अ.वा. कुलकर्णी पुरस्कार प्राप्त) ही दोन पुस्तके त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भेट दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,   डॉ. अतुल चौरे,  प्रा. सुप्रिया पवार आणि मराठी विभागातील विद्यार्थी  उपस्थित होते.

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.