Aundh : कोणत्याही उद्योग, व्यवसायात प्रामाणिकपणा महत्वाचा -एस. के वाडकर

औंधमध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – कोणताही उद्योग, व्यवसाय चालवताना प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. तरच व्यवसाय वाढतो, असे प्रतिपादन एस. के वाडकर यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहा दिवसांची ‘उद्योजकता विकास’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी एस. के वाडकर, वैकुंठ मेहता नॅशनल इंडस्ट्रीज मॅनेजमेंटचे प्रा. एम. आर. जोशी, रुपाली जाधव, वैभव जानकर, गणेश धायगुडे, प्रसाद राऊत, क्षितिजा सूर्यवंशी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे, उद्योजकता विकास समितीच्या चेअरमन प्राध्यापक नलिनी पाचर्णे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा.स्नेहल रेडे, डॉ.सुहास निंबाळकर, डॉ.तानाजी हातेकर, प्रा.सायली गोसावी, प्रा.प्रदिप भिसे, प्रा.हर्षकुमार घळके, डॉ.अतुल चौरे आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

  • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाडकर म्हणाले की, कोणताही उद्योग, व्यवसाय चालवताना प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. तरच व्यवसाय वाढतो. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी अंगभूत धैर्य असावे लागते. आपण नोकर होण्याऐवजी मालक होण्याची आणि नोकरी देण्याचे उदिष्टे ठेवायला पाहिजे. चाकोरीबाहेर जाऊन स्वतंत्रपणे एखादी गोष्ट करणे म्हणजे उद्योग करणे होय. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्षिमिबाई पाटील यांनी चाकोरीबाहेर जाऊन शिक्षणाचा व्यवसाय केला आणि हजारो लोकांना सुशिक्षित केले.

त्यानंतर प्रा. एम. आर. जोशी म्हणाले, वाढती लोकसंख्या फक्त शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्या उद्योग व्यवसायाकडे वळविने आवश्यक आहे.शेतीमध्ये पिकणाऱ्या कापसापासून छोटे-मोठे उद्योग सुरू करता येऊ शकतात. असे मत प्रा. एम. आर. जोशी यांनी व्यक्त केले.

  • महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, रयत शिक्षण संस्था ही क्लस्टर विद्यापीठ होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवातीच्या काळात नांगर विकण्याचे कार्य केले आहे. नंतर विविध प्रकारच्या शिक्षण संस्था काढून अशिक्षित समाजाला सुशिक्षित करून एक नवा सुशिक्षित समाज घडविला. उद्योग व्यवसाय छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतो. महाविद्यालयातील वातावरणात उद्योग-व्यवसायाचे वातावरण निर्माण करण्याचे महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेता- घेता स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करावा. म्हणून दहा दिवसांची ‘उद्योजकता विकास’ कार्यशाळा घेण्यात आली असल्याचे प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी सांगितले.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहा दिवसाच्या कार्यशाळेसाठी विविध उद्योजकांना महाविद्यालयात आणण्याचे आणि विद्यार्थ्यांशी संवाद घडवून देण्याचे कार्य अरविंद पित्रे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.