Aundh News : पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज -पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या पत्नी आणि मुलाचा खून करून (Aundh News) पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पती आणि पत्नी उच्चशिक्षित असून हे टोकाचे पाउल का उचलले याबाबत अद्यापपर्यन्त माहिती समोर आली नसून या घटनेमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 पती सुदिप्तो गांगुली (वय 44) , पत्नी प्रियांका गांगुली (वय 40) आणि तनिष्क गांगुली (वय 8)  अशी मृतांची नावे आहेत.

 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत पती सुदिप्तो गांगुली हे टीसीएसमध्ये कामाला होते.सुदिप्तो यांचा भाऊ बंगलोर येथून कालपासून फोन करीत होता.मात्र त्यांच्या फोनला कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळत नव्हता.त्यावर सुदिप्तो यांच्या भावाने त्यांच्या मित्राच्या मदतीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली होती.

 

Ravet News: अरवली टरेन व्हेहिकल चॅम्पियनशिप 2023 राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरचे नेत्रदिपक यश

त्याच दरम्यान औंध येथील सुदिप्तो गांगुली यांच्या राहत्या घरी जाऊन पाहणी केल्यावर,पॉलिथिनच्या पिशवीमध्ये मुलाचे तोंड गुंडाळलेले होते.तर पत्नीचा मृतदेह बेडवर होता. सुदिप्तो गांगुली याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
पती आणि पत्नी उच्चशिक्षित होते.पण कुटुंबीयांनी हे टोकाचे पाऊल का उचले.हे अद्यापपर्यन्त समजू (Aundh News) शकले नसल्याचे चतुःश्रृंगी पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.