Aundh News: सामाजिक न्याय विभागाच्या औंध शाखेचे खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

0

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या औंध शाखेचे राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरातील विविध प्रभागातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खासदार चव्हाण यांच्या हस्ते औंध शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब बोडके होते.

तसेच अजित शिंदे यांची औंध प्रभाग क्रमांक 8 च्या अध्यक्षपदी, आकाश कांबळे यांची उपाध्यक्षपदी, सलीम शेख यांची चिटणीसपदी, किरण पालके यांची सरचिटणीस पदी; तर हुसेन शेख यांची जनवाडी शिवाजीनगर उपाध्यक्षपदी, कृष्णा देशमुख यांची पाषाण सुतारवाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, माजी नगरसेवक उदय महाले, शिवाजीनगर सामाजिक न्यायचे अध्यक्ष आनंद कदम, शिवाजीनगर मतदारसंघाचे उपाध्यक्ष लखन गायकवाड, केदार मारणे, शेख, वैजनाथ वाघमारे, शंकर तेलंगे, सुदाम चांदणे, संतोष गायकवाड, निलेश रुपटक्के, मधुकर पवार, निलिमा शिंदे, मतदारसंघ अध्यक्ष लहु कांबळे, श्रीनिवास दासारी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन आनंद कदम, हेमंत ठोसर, अजित शिंदे, संतोष सोनवणे, मंदार टन्नु, सुरेश वाघमारे, श्रीनिवास दासरी, शंकर तेलंगे, रामा कांबळे, कृष्णा पटेकर, विशाल पटेकर, मधुकर मिसाळ, सुरेश वाघमारे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.