Aundh News: कर्जात बुडल्याने आयटी इंजिनिअरने स्वत:सोबत पत्नी आणि मुलाची केली हत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका आय टी इंजिनिअरने पत्नी आणि मुलाचा खून करून (Aundh News) स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 15 मार्च रोजी घडली होती. या आत्महत्येमागचे कारण समोर आले आहे. कर्जामध्ये बुडाल्याने आय टी इंजिनिअरने हे टोकाचे पाऊल उचलले. 

Today’s Horoscope 17 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सुदिप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुदिप्तो हा पुण्यामध्ये नोकरी करत होता. त्याने व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडली होती. त्याने ऑनलाईन भाजी विकण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचे ठरवले. परंतु, त्याला व्यवसायात यश आले नाही. उलट त्याच्यावर कर्ज वाढत गेले आणि कर्ज फेडू न शकल्याने त्याने ही आत्महत्या केली. या सोबतच त्याने आपल्या पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.