Aundh News : जागतिक एड्स दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स संस्था व जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय पुणे यांच्या वतीने 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत एड्स संबधित माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद सोनवणे व जिल्हा पर्यवेक्षक मारोती गायकांबळे यांच्या नियोजना नुसार पुणे जिल्ह्यातील तरुण व तरुणींना ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अति जोखीम गट, त्यांचे रहवाशीचे ठिकाण, रिक्षा चालक, ट्रक ड्राइवर, गरोदर माता, टीबी रुग्ण इत्यादीना एचआयव्ही तपासणीसाठी प्रोत्साहित करणे तसेच, जे एचआयव्ही संसर्गित आहेत त्यांना राष्ट्रीय कार्यक्रमास जोडून औषध उपचार चालू करणे आणि औषध उपचारात सातत्य ठेवणे हा त्याचा उद्देश आहे.

कार्यक्रमात जागतिक एड्स दिन निमित्ताने ऑनलाईन स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मास्क डिझाईन, जिआयएफ, मिम्स, एक मिनिटांचा प्रचारत्मक व्हिडीओ, सेल्फी विथ स्लोगन आदी विषयांचा समावेश आहे. स्पर्धैतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 1 ते 7 डिसेंबरपर्यंत स्पर्धैकांना आपले प्रविशिका [email protected] या ई-मेलवर पाठवता येणार असल्याचे औंध जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे.

‘जागतिक एकता, सामायिक जबाबदारी’ हे या वर्षीच्या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त आयसीटीसी, रिलीफ फौंडेशन, मंथन फाउंडेशन व इतर सामाजिक संस्थेमार्फत अति जोखीम गटाची व स्थलांतरित कामगारांची एचआयव्ही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा वायजी आर केअरचे दीपक निकम यांचे यासाठी सहकार्य मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.