BNR-HDR-TOP-Mobile

Aundh : तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरावे – सुनिता पाटसकर

औंध येथील महाविद्यालयात इनोव्हिजन फेअर उत्साहात

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरायला हवे, असे प्रतिपादन स्पार्क इंडस्ट्रिज ग्रुपच्या अध्यक्षा सुनिता पाटसकर यांनी केले. औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कॉमर्स विभाग आयोजित इनोव्हिजन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्पार्क इंडस्ट्रिज ग्रुपच्या अध्यक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्या सुनिता पाटसकर उपस्थित होत्या.

  • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनीता पाटसकर म्हणाल्या, छोटा-मोठा उद्योग व्यवसाय सुरू करून आपण त्याचे रूपांतर मोठ्या उद्योग व्यवसायात करायला हवे. सुरुवातीच्या काळात आपण बँकांचे कर्ज घ्यावे. परंतु कायमच बँकांवर अवलंबून न राहता, आपण आपल्या उद्योग-व्यवसायामधून भांडवलाची निर्मिती करायला हवी. महाविद्यालयातील तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरायला हवे. समाजाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे. असा व्यावसाय सुरू करायला पाहिजे. उद्योग, व्यवसाय करताना आपण आपल्या भोवती सामाजिक वलय निर्माण करायला पाहिजे. उद्योग, व्यवसाय करताना पैसा, प्रतिष्ठा याबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करावा.

त्यानंतर प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, महाविद्यालयातील मुलांना छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाची माहिती मिळावी. आणि आपल्या मधून एखादा उद्योगपती व्हावा. अशा हेतूने या ईनोव्हिजन फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. सुनिता पाटकर यांनी ब्युटी पार्लरच्या व्यवसायपासून सुरुवात करुन स्पार्क इंडस्ट्रीज ग्रुपच्या अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली आहे. आज त्यांच्या नावावर 5 फॅक्टरी आहेत. आपण ठरवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यांना नारीशक्ती, जे. आर. डी. टाटा, जनशक्ती अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुनिता पाटणकर यांचा आदर्श घेऊन छोटा-मोठा उद्योग व्यवसाय सुरू करावा.,असे आवाहन डॉ. मंजुश्री बोबडे यांनी व्यक्त केले.

  • विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इनोव्हिजन फेअरच्या स्टॉलचे उदघाटन सुनीता पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ.सुहास निंबाळकर यांनी तर आभार डॉ. संजय नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शॉर्टटर्म कोर्सच्या समन्वयक डॉ.सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्याध्यक्षा डॉ.शशी कराळे, प्रा.भीमराव पाटील आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

 

HB_POST_END_FTR-A4

.