BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गतविजेत्या उपविजेत्यांना धक्का देत औरंगाबाद विजेते

राज्यस्तरीय महिला हॉकी

एमपीसी न्यूज – पुणे – औरंगाबादच्या महिलांनी गतविजेत्या पुणे आणि नाशिकला धक्का देत दुसऱ्या राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात औरंगाबाद संघाने एकतर्फी लढतीत गतउपविजेत्या नाशिकचा 5-0 असा पराभव केला. किरीत ढेपे, अश्विनी कोडेकर, अस्मिता चव्हाण यांनी तीन मिनिटात तीन गोल करून मध्यंतराला औरंगाबाद संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. यात 17 व्या मिनिटाला किरीट, 18व्या मिनिटाला अश्विनी आणि 19 व्या मिनिटाला अस्मिताने गोल केला.

सामन्याच्या उत्तरार्धात काजल आटपाडकर हिने 27 आणि गौरी मुकाने हिने 32 व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

त्यापूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत औरंगाबाद संघाने गतविजेत्या पुणे संघाचे आव्हान 1-0 असे संपुष्टात आणले होते. नाशिकने यजमान एसएनबीपी अॅकॅडमी संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्यया सामन्यात पुणे संघाने एसएनबीपी संघावर 5-0 असा विजय मिळविला. भावना खाडे हिने 3,13 आणि 28व्या मिनिटाला गोल करून विजयात मोलाची भूमिका बजावली, अन्य दोन गोल अंकिता साप्ते आण रुचा गायकवाड या दोघींनी केले.

निकाल –
अंतिम सामना – औरंगाबाद 5 (किरीट ढेपे 17वे, अश्विनी कोडेकर 18वे, अस्मिता चव्हाण 19वे, काजल आटपाडकर 27वे, गौरी मुकाने 32वे मिनिट) वि.वि. नाशिक 0. मध्यंतर 3-0

तिसरा क्रमांक – पुणे 5 (भावना खाडे 3रे, 13वे, 28वे, अंकिता साप्ते 28वे, रुचा गायकवाड 60वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अॅकॅडमी 0. मध्यंतर 3-0

उपांत्य फेरी –
औरंगाबाद 1 (गौरी नुकाने 40वे मिनिट) वि.वि. पुणे 0. मध्यंतर 0-0

नाशिक 2 (सांची गांगुर्डे 8वे, 18वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अॅकॅडमी 0. मध्यंतर 2-0

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like