Australia : ऑस्ट्रेलियामध्ये 6 जूनपासून सुरु होणार स्पर्धात्मक क्रिकेट

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या थैमानानंतर क्रिकेट विश्वातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात क्रिकेटला सुरुवात होणार आहे. 

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये IPL सह जगभरातील सर्व क्रिकेट सामने पुढे ढकलले अथवा रद्द करण्यात आले होते. परंतु, आता ऑस्ट्रेलियामध्ये क्लब क्रिकेटला सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये डार्विन आणि जिल्हा क्रिकेट स्पर्धे अंतर्गत T-20 स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, हि स्पर्धा देशांतर्गत क्रिकेट असून ऑस्ट्रेलियाने निश्चित केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक सूचनांनुसार खेळली जाणार आहे. या स्पर्धेत, खेळाडूंना लाळ किंवा घामाने चेंडू चमकण्याची परवानगी दिली जाणार नाही.

डार्विन क्रिकेट मॅनेजमेंट चेंडू चमकावण्याच्या विविध पर्यायांचा शोध घेत आहेत यात अंपायरच्या उपस्थितीत वॅक्स पोलिश लावण्याचाही समावेश केला जाणार आहे.

स्पर्धांमध्ये भाग घेण्यापूर्वी क्लबना कोविड-19 सेफ्टी असेसमेंट योजना पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. हि असेसमेंट उत्तर प्रांत सरकारकडे सुपूर्द करावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना खेळण्यास मान्यता दिली जाईल.

सर्व आगामी खेळांवर कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे या स्पर्धा कधी खेळवल्या जाऊ शकतात याबद्दल अनिश्चितता आहे. मात्र, आॅस्ट्रेलिया मधून आलेल्या दिलासादायक बातमी मुळे क्रिडा रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.