Australia : ‘आयपीएल केवळ पैसा कमवायचा धंदा’ – अ‍ॅलन बॉर्डर

एमपीसी न्यूज – IPL केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी होणाऱ्या T – 20 विश्वचषकाऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांंनी केेले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता IPL चा 13 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, या हंगामाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान करण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांंनी IPL आणि T – 20 विश्वचषकावर मोठे विधान केेले आहे. एबीसीच्या ‘ग्रँडस्टँड कॅफे रेडिओ’च्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘मी या विचाराशी सहमत नाही. स्थानिक स्पर्धेपेक्षा जागतिक स्पर्धांना महत्त्व दिले पाहिजे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे जर T – 20 विश्वचषकाचे आयोजन झाले नाही, तर मला वाटत नाही की आयपीएलचे आयोजन होऊ शकते. मी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. तसेच हा केवळ पैसा कमाविण्याचा व्यवसाय आहे. हे बरोबर नाही.

ते पुढे म्हणाले की, T20 विश्वचषकाला निश्चितपणे प्राधान्य दिले पाहिजे. ऑस्ट्रेलियाला आपल्या खेळाडूंना IPL खेळण्यापासून रोखले पाहिजे. तुम्हाला माहित आहे की, भारत IPLचे आयोजन करत आहे.

ते याच्या खूप जवळ आहेत. परंतु जर तुम्ही जागतिक क्रिकेट उत्पन्नाच्या ८० टक्के भाग असाल तर जे काही होईल त्यामध्ये तुमचेच ऐकले जाईल, हे मला माहिती आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

मला वाटते की, जागतिक क्रिकेट याला परवानगी देणार नाही. मला वाटत नाही की, आंतरराष्ट्रीय खेळाच्या बाबतीत भारताला अव्वल स्थानावर ठेवले जाईल. हे चूकीच्या मार्गाने जाण्यासारखे होईल, असेह मत भारताबद्दल बोलताना बॉर्डर यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.