Ind Vs Aus Test Series : ऑस्ट्रेलियाची दुस-या इंनिगमध्ये 294 धावांपर्यंत मजल, भारतासमोर 328 धावांचे आव्हान 

 मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ केला गारद  

एमपीसी न्यूज : ब्रिस्बेनमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुस-या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने 294 धावांपर्यंत मजल मारली. भारतासमोर विजयासाठी आता 328 धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजानी उत्कृष्ठ कामगिरी केली, मोहम्मद सिराजने पाच बळी घेतले तर, शार्दुल ठाकूरने चार गडी बाद केले.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. वॉर्नर-हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागिदारी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथनं सर्वाधिक 55 धावा काढल्या. त्याव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर (48), हॅरिस (38), लाबुशेन (25), कॅमरुन ग्रीन(37) आणि कर्णधार पेन (27) धावा केल्या.

दुसरीकडे भारतीय संघाच्या गोलंदाजानी उत्कृष्ठ कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लावला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच बळी घेतले तर, शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं. संदुरला एक बळी मिळाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत  विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची गरज आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 बरोबरीत आहे. भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व क्रिडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.