Australia : विराट कोहलीचा संघावर समान प्रभाव -डेव्हीड वॉर्नर

एमपीसी न्यूज – विराट कोहली हा आक्रामक फलंदाज असून तो प्रतिस्पर्धीवर तुटून पडतो तर, स्टिव्ह स्मिथ फलंदाजीचा आनंद घेतो. असे असले तरी, दोन्ही खेळाडूंचा आपल्या संघावर समान प्रभाव आहे, असे मत ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हीड वॉर्नर यांने व्यक्त केले आहे.

डेव्हीड वॉर्नर म्हणाला, दोन्ही फलंदाज आत्ताच्या काळातील जगात सर्वोत्तम खेळाडू पैकी एक आहेत. दोघांनी सुद्धा आपल्या क्षमता वेळोवेळी सिद्ध केल्या आहेत. पण विराट कोहलीची धावा करण्याची आवड आणि जिद्द स्टिव्ह स्मिथ पेक्षा वेगळी आहे असे मत डेव्हीड वॉर्नर यांने हार्षा भोगले यांच्याशी ऑनलाईन चर्चे दरम्यान व्यक्त केले. दोन्ही फलंदाजापैकी सर्वोत्तम कोण या तुलनात्मक प्रश्नाला उत्तर देताना त्यांने आपले मत मांडले.

स्टिव्ह स्मिथ जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तो त्याचा नैसर्गिक खेळ खेळतो, काही मोठे शाॅट मारतो. स्मिथ त्याचा खेळ आणि फलंदाजीचा आनंद लुटत असतो. तर कोहली मैदानावर आल्यानंतर सगळं नियंत्रण आपल्या हातात घेतो. त्याला हे माहीत असते की त्याचे मैदानावर टिकून राहणे संघासाठी आत्यावश्यक आहे.

एवढेच नव्हे तर थोडा वेळ मैदानावर घालवल्यानंतर आपण मोठी धावसंख्या उभारू शकतो असा विश्वास देखील त्याच्यात निर्माण होतो. तसेच विराट कोहलीचे मैदानावरचे अॅग्रेशन सगळ्यांना माहीत आहेच. वॉर्नर म्हणतो दोन्ही खेळाडू मानसिक आणि शारीरिक दुष्ट्या मजबूत आहेत. त्यांची उत्कृष्ट कामगिरी सर्व संघाचे मनोबल वाढवू शकते हे ते जाणतात.

वॉर्नर पुढे म्हणाला, दोन्हीही उत्कृष्ट खेळाडू असून संघाचे मनोबल वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. जेव्हा ते चांगली धावसंख्या उभारतात तेव्हा त्यांच्यातला उत्साह तुम्ही मैदानावर अनुभवू शकता असे वॉर्नर म्हणाला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांने सुद्धा सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम येत्या सात ते आठ वर्षात विराट कोहलीच मोडेल असा विश्वास व्यक्त केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like