Dighi News : रिक्षा चालवण्याच्या बहाण्याने रिक्षाची केली चोरी

एमपीसी न्यूज – रिक्षा अशी उभी ठेऊ नका, मी तुम्हाला चालक देतो. (Dighi News) तो तुम्हाला रोज पैसे आणून देईल, असे म्हणून नेलेली रिक्षा चोरी केली. ही घटना 3 ऑक्टोबर 2021 रोजी दत्तनगर, दिघी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. 24) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर महेंद्र बटेलु (वय 33, रा. परांडेनगर, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : मालमत्ता करासंदर्भात काही प्रश्न पडलाय? थेट सहाय्यक आयुक्तांना विचारा  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओळखीचा फैयाज मोमीन यांनी फिर्यादीस सांगितले की,50 हजारांची रिक्षा अशी उभी ठेऊ नका. मी तुम्हाला रिक्षा चालक देतो.(Dighi News) तो दररोज 180 रुपये आणून देईल. ते पैसे मी तुम्हाला देतो, असे फैयाज याने फिर्यादीस सांगितले. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादींनी त्यांची रिक्षा (एमएच 12/क्यूई 5009) आरोपी मयूर याला चालविण्यास दिली. त्यानंतर त्याने रिक्षा नेली आणि ठरल्याप्रमाणे भाडे न देता रिक्षाही परत केली नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.