Pune: पुण्यातील किगा आईसक्रीम पार्लरमध्ये मिळते आईसक्रीम थाळी 

एमपीसी न्यूज़ – ऋतू कुठलाही असो, आईसक्रीमला नाही म्हणणारी व्यक्ती चुकूनही सापडणार नाही. नाही का? गरमीच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा एकमात्र पदार्थ म्हणजे आईसक्रिम..आतापर्यंत कोनमध्ये मिळणारी आईसक्रिम, वाटीत मिळणारी आईस्क्रीम, असे आईस्क्रीमचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील..पण या लेखातून आम्ही एका नवीन आईसक्रीम पार्लरची ओळख करून देणार आहोत..त्याच नाव आहे ‘किगा आईसक्रीम’. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर हे पार्लर आहे..या आइसक्रीम पार्लरच वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी आईसक्रीम थाळी.
किगा आइसक्रीममध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारात थाळी मिळते. यामध्ये पेशवाई थाळी, क्लासिक थाळी, बाळराजे थाळी, चॉकलेट थाळी आणि उपवास थाळी यांचा समावेश आहे.

प्रत्येक थाळीत वेगवेगळ्या फ्लेवरची आठ आइसक्रीम असतात..याव्यतिरिक्त पाणीपुरी, शाही मेवा खीर, शाही गुलकंद, तिळगुळ, पुरणपोळी, साजूक तुपातले उकडीचे मोदक,  बदाम रॉयल क्रीम, गाजर बदाम हलवा, स्पेशल मँगो मस्तानी, स्पेशल ड्रायफ्रुटस या वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्येही आईस्क्रीम आहेत.
किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या दोन मित्रांनी एकत्र येत सहा महिन्यांपूर्वी हे पार्लर सुरू केले आहे. पुणे शहराच्या बीबीध भागात आता त्यांच्या १३ शाखा आहेत. या पार्लरमध्ये मिळणारे विबिध फ्लेवरची आईसक्रीम खाण्यासाठी दररोज सायंकाळी ग्राहकांची गर्दी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.