Avinash Bhosale Arrest Update : उद्योजक अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयात करणार हजर

एमपीसी न्यूज – डीएचएफल प्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात आली असून आज (दि.27) उद्योजक भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अटकेनंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

पुण्याचे उद्योजक अविनाश भोसले यांना गुरूवारी (दि. 26 मे) सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बीकेसी कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी भोसले यांना अटक करून येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी त्यांची चौकशी सुरू केली.

दरम्यान उद्योजक भोसले यांना आज विशेष सीबीआय न्यायालयात  हजर करण्यात येणार असून अधिक चौकशीसाठी त्यांची कोठडी मागितली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अविनाश भोसले कोण आहेत?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यवसायिक म्हणून पुण्यासह राज्यात ओळख आहे तसेच ते काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. एवढेच नाही तर अविनाश भोसले यांचे सगळ्याच पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या कारवाईमुळे भोसले अडचणीत सापडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.