Maval : अविशा जाधव यांच्या इच्छाशक्तीला मिळाली सुनील शेळके यांच्या मदतीची जोड

रिक्षा घेण्यासाठी केले सहकार्य

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील अविशा जाधव या महिलेने अथक परिश्रम करुन रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तिची कष्ट करण्याची जिद्द पाहून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी तिच्या कष्टाला हातभार म्हणून रिक्षा घेण्यासाठी सहकार्य केले. 

अविशा जाधव या महिलेने रिक्षा चालविण्याचे योग्य प्रशिक्षण घेतले. तसेच रिक्षा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले परमिट, वाहन परवाना व बॅच या सर्व गोष्टी कौशल्याच्या जोरावर मिळविल्या. तिच्या या कौशल्यामध्ये सुनील शेळकेंनी ही हातभार लावून रिक्षा घेण्याचे सहकार्य केले. जाधव यांनी घेतलेल्या रिक्षाची सुनील शेळके यांच्या हस्ते पूजा केली. सुनील शेळके यांनी रिक्षा चालविताच त्या महिलेच्या चेह-यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसून आला. तिच्या या कौशल्याचे कौतुक होत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.