Talegaon Dabhade : भाजपचे महावितरण कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.

72 लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडीत करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही निर्णयाविरोधात महावितरणला टाळे ठोको आंदोलनात माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी आवाहन करून सरासरी वीजबिलाची दुरूस्ती केल्याशिवाय वीज कनेक्शन तोडु नये.अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिवसेनेच्या दुटप्पीपणावर टिका करुन छोटे व्यावसायिक,दुकानदार यांच्या व्यवसायामध्ये आलेल्या चढउतारांचा विचार करुन वीजबिले द्यावीत. तसेच शेतक-यांच्या पंपाची वीज तोडु नये अशी मागणी केली. शहराध्यक्ष रविंद्र माने यांनी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी भावना व्यक्त करुन महावितरण कार्यालयाला टाळे ठोकल्या शिवाय थांबणार नाही अशी भुमिका मांडली.

उपनगराध्यक्ष सुशीलभाऊ सैंदाणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या  श्रेयवादाच्या लढाईमध्ये नागरिक भरडले जात असल्याची टिका केली. यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, गटनेते अमोल शेटे,सरचिटणीस रजनी ठाकूर,महिला मोर्चा तळेगाव स्टेशन विभाग अध्यक्षा अंजली जोगळेकर,गाव विभाग अध्यक्षा मोहिनी भेगडे,अध्यक्ष शिवांकुर खेर,व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल, युवती आघाडी अध्यक्षा कु.अपूर्वा मांडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यानंतर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून धरणे आंदोलनाला बसले असता या वेळी महावितरणाचे अधिकारी राजेंद्र गोरे यांनी शहरातील एकही वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

 या टाळे ठोको आंदोलनाला नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर,नगरसेवक संतोष शिंदे,नगरसेविका शोभा भेगडे, काजल गटे, राजेश सरोदे, अॅड श्रीराम कुबेर, सरचिटणीस विनायक भेगडे,रविंद्र साबळे,प्रदीप गटे,प्रमोद देशक,रविंद्र भोसले,सचिव महावीर कणमुसे,युवा मोर्चा अध्यक्ष गाव विभाग अक्षय भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,कार्याध्यक्षा अश्विनी काकडे,स्टेशन भाग कार्याध्यक्षा तनुजा दाभाडे, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित,संजय जाधव,संजय दाभाडे, सचिन आरते,विनोद भेगडे,गणेश आप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पारगे,तानाजी पारगे,जयंत कदम,आघाडी अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्षा पल्लवी गवारे,सरचिटणीस मीना भेगडे,किर्ती लोणकर,उपाध्यक्षा संज्योगीता आगळे,सचिव रुपाली भेगडे,आशा रायरीकर,मंगल भेगडे, मालती म्हाळसकर,युवती सरचिटणीस साक्षी ठाकुर,सोशल मिडिया अध्यक्ष गौरव शहा,अनु.जाती मोर्चा कार्याध्यक्ष संदीप चव्हाण,ओ.बी. सी.मोर्चा  अध्यक्ष  नितीन पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागर शर्मा,विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष मयुर भोकरे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक,पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे,प्रसिद्धीप्रमुख महेश सोनपावले,भाजयुमो संघटनमंत्री केदार भेगडे,सरचिटणीस निखिल म्हाळसकर, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अरुण शुक्ला,रामभाऊ माने,सचिन घारे,आदेश जाधव,विशाल जव्हेरी,मयुर पाठारे,राहुल पाठारे,उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.