Pune News : उधळपट्टी टाळा, माजी महापौर संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे मागणी 

एमपीसी न्यूज  : महापालिकेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनावश्यक कामावर भरमसाट खर्च केला जात आहे, हा खर्च थांबवावा, अशा प्रकारची मागणी पुणे शहर माजी महापौर संघटनेतर्फे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली. 

संघटनेचे अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सेक्रेटरी कमलताई व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, अंकुश काकडे, दत्तात्रेय धनकवडे, रजनी त्रिभुवन यावेळी उपस्थित होते. यावेळी काही कामानिमित्ताने भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने या ठिकाणी काही कामानिमित्त आले. त्यांनीदेखील माजी महापौरांची ही मागणी योग्य आहे, त्यासंदर्भात जरूर दखल घ्यावी, असे मत व्यक्त केले.

शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांची नावे देत असताना त्याचे रंग, आकार एकसारखा असावा, अशीदेखील मागणी होती. तिलादेखील सर्वांनी पाठिंबा दिला. आयुक्तांनी ताबडतोब अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना या संदर्भातील कारवाईच्या सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.