Chinchwad : तंबाखू, गुटखा व पानमसाला यांच्या प्रतिकात्मक होळीतून जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी आज (सोमवारी) दुपारी अजंठानगर येथे साजरी करण्यात आली. या मध्ये तंबाखु,गुटखा, पानमसाला, सिगारेट, बीडी या सारख्या पाकीटांची होळी पेटवून व्यसनमुक्तीचे नारे देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे,पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता ताठे, ऋतुजा बिराजदार, श्वेता पाटे, शलाका बनगर, हिना आत्तार, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, प्रदीप गायकवाड, रशिद सय्यद, रविराज साबळे, राहुल चौधरी, नवनाथ साबळे, रुपेश धेंडे, राहुल साखळे, पल्लवी साखळे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक ‍पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फजल शेख म्हणाले, आजच्या तरुण पिढीमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये  व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी व्यसनाधीनते कडे वळत आहेत. तसेच आजचा तरुणांचे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होताहेत व अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना त्यामुळे अनेकांना सामोरे जावे लागते, श्वसनाचा त्रास, फुफ्फूसाचा विकार, मेंदूवरील संतोलन जाणे, असे अनेक रोग होण्याची शक्यता आसते, त्यामुळे आजची काही तरूण पिढी ही भविष्याचा कोणताही विचार न करता व्यसनाला महत्व देत आहे, गंभीरबाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

वर्षा जगताप व गंगा धेंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणटले, गोवा, मावा, गुटखा यांच्या विक्रीस संपूर्ण पणे बंदी असताना देखील याची पानपट्टीवर राजरोसपणे विक्री चालू असल्याने आजची तरूण पिढी हे व्यसनाधिनतेकडे वळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.