Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त आणि निगडी (Nigdi) प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांचा 40व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Pimpri : पथनाट्यातून मासिक पाळीच्या आरोग्याची जनजागृती
दिनांक 28 मे 2023, रविवार रोजी सायंकाळी ठीक 6.30 वाजता राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य डॉ. रमेश पांडव यांचा शुभहस्ते मणिपूर राज्यातील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेला एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रावास या संस्थेला एक्कावन्न हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
निगडी (Nigdi ) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने हे आव्हान केले आहे की , विना शुल्क असलेला सोहळा सर्व नागरिकांनी आवर्जून पाहावा.
Bhosri : खिशातला मोबाईल घेतला म्हणून तरुणावर जिवघेणा वार