Pune : प्रताप गोगावले यांना स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान 

एमपीसी न्यूज – प्रताप गोगावले यांना स्वामी समर्थ सेवा पुरस्कार रविवारी (दि.१६) स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या तर्फे प्रदान करण्यात आला. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले उपस्थित होते. 

समाजकारण आणि वंचितांसाठी काम करणाऱ्या प्रताप गोगावले यांना या वर्षीचा सहावा स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या तर्फे देण्यात आला. या प्रसंगी अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले तसेच अण्णा थोरात व अशोक गोडसे उपस्थित होते.

गीत गायन व रांगोळी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये जवळपास ८० लोकांनी रक्तदान केले तसेच अन्नछत्र द्वारे मोफत अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमात पुढे  चित्रकार योगेश खरवलीकर यांनी स्वामी समर्थ यांचे प्रत्यक्ष चित्र काढत उपस्थितांची मने जिंकली.

प्रताप गोगावले यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी विनायक घाटे यांनी घेतला, गरिबांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि दान धर्म करत त्यांनी धार्मिक आणि सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम केले आहे. गोर गरीब आणि वंचितांसाठी झटणाऱ्या गोगावले यांचा हा यथोचित सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रताप गोगावले यांनी संयोजन समितीचे आभार मानले तसेच गोगावले मठात राबवत असलेल्या मोफत इंदिरा आरोग्य सेवा या विषयी उपस्थितांना माहिती दिली व अनुभव कथन केले.पुरस्कार सोहळ्या प्रसंगी श्रीपाद थोरात, बाबा रोटे, विनायक घाटे, गोगावले स्वामी माठातील सर्व सेवेकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.