Maval News : पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती

 एमपीसी न्यूज- वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेच्या वतीने, आंदरमावळात पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. आंदर मावळातील 12 वाड्या वस्तीवर संस्थेच्या स्वयंसेवकांनी कोरोना लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. शनिवारी (दि.12) पथनाट्य सादर करण्यात आली.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरलेल्या लसीकरणाला ग्रामीणभागातून नकार मिळत आहे. लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजामुळे लोक त्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेने आंदर मावळातील 12 वाड्या वस्तीवर पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाविषयी जन जागृती केली. नागरिकांना लसीविषयी शास्त्रीय माहिती देऊन लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आले.

तसेच, यावेळी संस्थेने Knorr Bremse Global Care Asia Pacific  या कंपनीच्या वतीने आंदर मावळातील 12 वाड्या वस्त्यांमध्ये गरजू लोकांना धान्य वाटप केले. अशी माहिती वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.