Akurdi : सीआयआय आणि सीएसआर सेलतर्फे वाहतूक नियमाबद्दल जनजागृती

एमपीसी न्यूज – सीआयआय आणि सीएसआर सेल पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे खंडोबा माळ आकुर्डी येथे वाहतूक नियमाबद्दल आज (शनिवारी)  जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महापौर उषा ढोरे यांनी कार्यक्रमात सहभाग घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा जाधव तसेच पोलिस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे व सीआयआय आणि सीएसआर सेलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी महापौर उषा ढोरे यांच्याकडून पीएमपीएलच्या बसेस वरती वाहतूक जनजागृतीचे स्टीकर चिटकवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.