Vadgaon Maval : भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत जनजागृती उपक्रम

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना ही केंद्र सरकार मार्फत सन २००८ पासून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. इतर कंपनींच्या तुलनेत सामान्य जनतेला अतिशय अल्पदरामध्ये औषधे उपलब्ध व्हावेत या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

मागील वर्षापासून केंद्र सरकार मार्फत ७ मार्च हा दिवस सबंध भारतात जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. जनऔषधी या इतर औषधांइतक्याच प्रभावी असून अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध आहेत. यंदाही १ मार्च ते ७ मार्च जनऔषधींच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनऔषधी योजनेच्या लाभार्थींबरोबर व्हिडिओ कॉन्फेरेंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्रातील अधिकाधिक जनतेला या योजनेचा लाभ घेता यावा या अनुषंगाने हे जागरूकता अभियान राबवण्यात आल्याची माहिती भारतीय जनऔषधी परियोजनेचे महाराष्ट्र व गोवा विभागीय सहाय्यक व्यवस्थापक श्रीपाल समदारिया (मो.०८०५५१५०७०७) यांनी दिली.

प्रधान मंत्री भारतीय जन औषधी केंद्र वडगाव मावळ पुणे येथे शनिवारी (दि. ७) सकाळी १० वाजता जन औषधी दिवस साजरा केला जाणार आहे. नगर अध्यक्ष मयूर ढोरे, उपनगर अध्यक्ष राहुल ढोरे, नगरसेविका प्रमिला राजेश बाफणा यांच्या उपस्थितीत आहे. त्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनऔषधी योजनेच्या लाभार्थींबरोबर व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

तसेच मोफत नेञ व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वेळ स. 11 ते 2 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रूग्णांना त्याच दिवशी ऑपरेशनसाठी मोहन ठुसे नेञ रूग्णालय, नारायणगाव येथे नेण्यात येणार आहे. सतिश धोंगडे (जनसंपर्क अधिकारी) मोबाइल ९९७५५६३४४६ डॉक्टर मनोहर डोळे फाऊंडेशन, मोहन ठुसे नेञ रूग्णालय, नारायणगाव आणि HEALTH ATM {DIAGNOSTIC & CONSULTING} चे उद्घाटन समारंभ कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. ही विनंती संदीप गौतमचंदजी बाफना यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करावा. ९८२२४४८४६१ / ९०२११५६५९५ / ९०२१९१४०६०

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.