Pimpri News : ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या जनजागृतीस सुरूवात; जनजागृती रथाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने “घरोघरी तिरंगा” या मोहीमे अंतर्गत शहरात तिरंगाबाबत प्रचार व प्रसार करणात येणार आहे. त्याबाबतच्या जनजागृती रथाचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, माहिती, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, खुशाल पुरंदरे उपस्थित होते. या रथाद्वारे शहरभर सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.