“Alandi : इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट”तर्फे आळंदी शहरात जागृती मोर्चा, पथनाट्य
जागतिक तंबाखू विरोधी दिन

एमपीसी न्यूज – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आळंदी (Alandi) येथील “इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट”तर्फे, आळंदी शहरात एक जागृती मोर्चा व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
Pune : रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘सूर्यदत्त’च्या मनीष राठोडला सुवर्णपदक
आळंदीतील (Alandi) वडगांव चौक, पोलिस स्टेशन आळंदी तसेच श्री. ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर या ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले. आज एकादशीनिमित्त गर्दी असल्यामुळे भाविकांची खुपचं गर्दी होती, सर्वांनी या उपक्रमाचे खुप कौतुक केले.
सर्व सहभागी कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. याबाबत माहिती मुख्य वैद्यकीय आधिकारी डॉ. नितीन गोसावी यांनी दिली.