Nashik News : लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोना नियमा संदर्भात रायुकाँची जनजागृती

एमपीसी न्यूज : नाशिक मध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून नाशिकमध्ये लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळणे गरजेचे आहे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रत्येक सिग्नलवर “नियम पाळा, लॉकडाऊन  टाळा” असे बॅनर लावले आहे.

नाशिक मध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही जनजागृती होत नसून नागरिक बेफिकीरीने फिरताना दिसतात. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय खरं. परंतु नागरिकांमध्ये पुन्हा जनजागृती होणे तितकेच महत्वाचे आहे.

यामुळे वाहनधारकांना आपल्या कुटुंबासह इतरांच्या आरोग्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शहरातील विविध सिग्नलवर युवक राष्ट्रवादीच्या वतीने “नियम पाळा, लॉकडाऊन  टाळा” असे बॅनर लावण्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन कठोर पाउले उचलत असली तरी नागरिक गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरताना दिसतात तसेच सॅनिटायझरचा वापर करत नाही.

यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नाशिक लॉकडाऊनच्या दिशेन वाटचाल करताना पहावयास मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच नाशिक मध्ये प्रशासन कडक निर्बंध लागू करून लॉकडाऊन करतील. लॉकडाऊन पासून वाचण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करून गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जनजागृती करण्यासाठी सिग्नलवर बॅनर लावले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.