Vadgaon maval News : मास्क, सॅनिटायझर वापराबाबत सुचनापर जनजागृती

वडगाव शहर भाजपाचा उपक्रम 

एमपीसी न्यूज : वडगांव मावळ येथील शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरूवार (दि 18) आठवडे बाजारातील भाजी, फळे, कपडे इतर वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मास्क आणि सॅनिटायझर वापराबद्दल जनजागृतीपर सूचना करण्यात आल्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर हे अत्यंत महत्वाचे साधन असल्याने सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याची माहिती यावेळी विक्रेत्यांना देण्यात आली आणि मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी माजी सभापती गुलाब म्हाळसकर, वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष किरण भिलारे, नगरसेवक प्रसाद पिंगळे, मावळ तालुका भारतीय जनता पक्ष प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे , योगेश कृ. म्हाळसकर , युवा मोर्चा कार्याध्यक्ष शेखर वहिले, महेंद्र अ. म्हाळसकर, क्रिडा आघाडी अध्यक्ष महेश म्हाळसकर आदींनी आठवडे बाजारामध्ये फिरून कोरोनाबाबत जनजागृती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.