PimpleGurav : डेंग्यू, मलेरियावर जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज –  मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने क्रांती दिनाच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहून.डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड,लेफ्टो,सारख्या आजारावर जून्या सांगवीतील मजूर अडयावर,तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली.

यावर्षी पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचे प्रपंच उद्धस्त झाले आहेत. रोगराई निर्माण झाली आहे. ताप,सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजाराबरोबरच डेंग्यू सारखे जिवघेणा आजार ही बळकावत आहे. हा आजार होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना व झाल्यावर काय उपाययोजना  करावयाच्या याची माहिती दिली. पाणी तुंबल्यावर लेफ्टो, आजार होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रो, काँलरा, होऊ नये म्हणून दुषित पाणी पिऊ नये. पाणी उकळून प्यावे, डासांची उत्पती रोखण्यासाठी आपला परीसर स्वच्छ ठेवावा, उघडे पदार्थ खाऊ नयेत, डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढत आहे, म्हणून घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवडयातुन एकदा रिकामी करावीत. एक दिवस कोरडा पाळावा, टाक्यांना घट्ट झाकण लावावे, भंगाराची व्हिल्लेवाट लावावी, पाण्याची डबकी आपल्या घराभोवती साचू देऊ नका, डेंग्यू म्हणजे डंख छोटा धोका मोठा, डासाची उत्पती साठलेल्या पाण्यात होत असल्याने सर्वांनी स्वतः बरोबरच आपला परीसरही स्वच्छ ठेवण्याचे आव्हान मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी स्पीकरद्धारे, पत्रकाद्धारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना करत होते. तसेच आम्ही यापुढे ही झोपडपट्टी, मोठमोठ्या सोसायटीमध्ये ही जनजागृती करणार आसल्यचे जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी अरुण पवार व अंबरनाथ कांबळे यांनी ही स्पीकरद्वारे नागरिकांना आव्हान केले. यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे, मराडवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, मुळशी विभाग प्रमुख मिनाताई करंजवणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सहसचिव गजानन धाराशिवकर, ऋतुजा जोगदंड पंडीत वनसकर, आरोग्य सुपरवायझर विनोद कांबळे ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, शहर युवक अध्यक्ष अतिश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय जगदाळे, हनुमंत पंडित, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडेवार, बदाम कांबळे, मनपा शाळेतील मुख्याध्यापक पाडुरंग मदगुम, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, इंद्रजीत चव्हाण आदी शिक्षकांनी ही सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.