Awas Yojana : आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Awas Yojana) वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना 40% आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना 80% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे. 31 मे 2022 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये (Awas Yojana) चऱ्होली 40% आणि बोऱ्हाडेवाडी 80% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन 31 मे पर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी. अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Pcmc Election ward composition : प्रभागरचनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद; बुधवारी सुनावणी

या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन,भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे – या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे. 31 मे पर्यंत लाभार्थ्यांनी स्वाहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.