Ayodhya Ram Temple: ठरलं ! 5 ऑगस्टला श्रीराम मंदिराचे भूमीपूजन, पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

Ayodhya Ram Temple: Bhumi Pujan of Shri Ram Mandir on 5th August, Prime Minister Modi will be present पाच कळसांच्या या मंदिराच्या समोर दिशेनुसार पंचदेव विराजमान असतील.

एमपीसी न्यूज- अयोध्या येथे राम मंदिरसाठी 5 ऑगस्ट रोजी भूमी पूजन होणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला 3 आणि 5 ऑगस्ट तारीख पाठवली होती. पीएमओने 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमी पूजन कार्यक्रमात सहभागी होतील.

शनिवारी झालेल्या मंदिराच्या ट्रस्टच्या बैठकीनंतर दोन तारखा निश्चित करण्यात आली होती. या बैठकीला चंपत राय यांच्याशिवाय अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंददेव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासमवेत इतर ट्रस्टी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 200 मान्यवरांची उपस्थिती असेल असे सांगण्यात येते.

या मंदिराचे गर्भगृह जमिनीपासून 19 फूट उंच असेल. जमिनीच्या पातळीच्या वर प्रथम व द्वितीय असे टप्पे असतील. पाच कळसांच्या या मंदिराच्या समोर दिशेनुसार पंचदेव विराजमान असतील. मंदिराच्या या स्वरूपाची तयारी सहा महिन्यांपासून सुरू होती.

ट्रस्टकडे 67.7 एकर जमीन आहे. मंदिरासाठी यातील 5.5 एकर वापरली जाईल. उर्वरित 62.2 एकर भाविकांच्या सुविधांसाठी तसेच प्रसादालयासाठी वापरली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.