Pimpri : वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी अजीज शेख यांची निवड

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी अजीज शेख यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सहीने त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व मानव अधिकार क्षेत्रातील योगदान, पक्षाच्या व्यापक ध्येय धोरणांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यात यावा.  समाजहिताचे कार्य पक्षाच्या माध्यमातून व्हावे, याकरीता निवड करण्यात आली असल्याचे, रामदास आठवले यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.