Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या यशस्वितेत बबनराव भेगडे यांचा सिंहाचा वाटा – माजी आमदार बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – ‘पुणे पीपल्स बँक’, तळेगाव (Pune People’s Bank) शाखेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत बबनराव भेगडे यांचा सिंहाचा वाटा आहे. या शाखेला यशोशिखरावर नेण्याचे सर्व श्रेय हे बबनराव भेगडे यांना जाते. अशी कौतुकाची थाप माजी राज्यमंत्री, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी दिली. पुणे पीपल्स को. ऑप. बँकेच्या तळेगाव स्टेशन शाखेचा 22 वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. पुणे पीपल्स बँकेने आजवर समाजातील विविध घटकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी मोठी मदत केली असल्याचेही बाळा भेगडे म्हणाले.
तळेगाव दाभाडे येथील रीक्रिएशन हॉलमध्ये झालेल्या कामगार मेळाव्यात माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे बोलत होते. यावेळी पुणे पीपल्स बँकेचे संचालक श्रीधर गायकवाड, दिलीप दगडे, जनार्दन रणदिवे, बिपीनकुमार शहा, संजय गुळवे, सुभाष नढे, डॉ. रमेश सोनवणे, अंबर चिंचवडे, संजय जगताप उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे बोलताना म्हणाले, की तळेगाव शाखेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत बबनराव भेगडे यांचा सिंहाचा वाटा आहे. या शाखेला यशोशिखरावर नेण्याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. बहुजन समाजातील कामगारांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन आर्थिक पाठबळ दिले. त्यानिमित्ताने कामगारांचे घराचे स्वप्नही पूर्ण केले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम पुणे पीपल्स को. ऑप बँकेने केले आहे. तसेच, मावळ तालुक्यात बँकेने क्रांती केली आहे. त्याचे श्रेय बबनराव भेगडे (Pune People’s Bank) यांना जाते असेही बाळा भेगडे म्हणाले.

Pimpri Plagathon Expedition : प्लागेथोन अभियानांतर्गत साडेसहा टन कचऱ्याचे संकलन

यावेळी ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, मनोहर दाभाडे, अतुल पवार, रामदास वाडेकर, प्रभाकर तुमकर, जगन्नाथ काळे, राजेश बारणे यांसह माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, उद्योजक दिलीप राजगुरव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बबनराव भोंगाडे, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे कायदा विभाग प्रमुख ॲड. शंकरराव ढोरे, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, टाकवेचे माजी सरपंच बाबाजी गायकवाड, व्यवस्थापिका तस्लीम शेख, कामगार प्रतिनिधी, विविध पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. आयोजित सत्यनारायण महापूजेत आणि भव्य ग्राहक मेळाव्यात ग्राहक, हितचिंतक व ठेवीदारांनी सहभाग घेतला.
बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे (Pune People’s Bank) अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी प्रास्ताविकात विमा संरक्षणाने बँकेला व आपल्या परिवाराला सुरक्षा कवच देण्याचे कामगार वर्गाला आवाहन केले. कामगारांच्या मागणीला न्याय देण्याकरिता बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये व्याजदर कमी करण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली. तर, ठेवीदारांनी, कर्जदारांनी आणि सभासदांनी बँकेच्या संदर्भात कुठल्याही अडचणींसाठी थेट संपर्क करण्याचे आवाहनही भेगडे यांनी केले.

 

Pimpri News : भावी काळात पदवीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व!” – ॲड. प्रवीण निकम

सुरुवातीस कामगारवर्गाने बँकेसंबंधी (Pune People’s Bank) आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी कामगारांच्या भावना जाणून घेऊन आपण पुढील काळात सहज सोप्या पद्धतीने तसेच नियमांतर्गत व्यवहार करणार असून नवोदितांना, तरुणांना, आर्थिक पाठबळ कसे दिले जाईल, सभासद आणि बँक यात सलोखा कसा राहील, आदी बाबींवर विशेष विचार करणार असल्याचे जाहीर केले.
उपाध्यक्ष सुभाष गांधी यांनी आभार मानले. सहाय्यक सरव्यवस्थापक संजय जाधव आणि शाखा व्यवस्थापक अजय शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.