Maval News : ग्रामपंचायतींना यापुढे विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – बाबुराव वायकर

एमपीसी न्यूज – ब्राम्हणवाडी गावात आतापर्यंत दीड ते दोन कोटी रूपयांची विकास कामे पुर्ण झाली आहेत. साते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद फंडातून आज पर्यंत सुमारे 6 कोटी 50 लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. पुढील काळात देखील अशा प्रकारची विविध विकासकामे केली जातील. ग्रामपंचायतींना यापुढे विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून साते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणवाडी या ठिकाणी 30 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा उदघाटन व लोकार्पण सोहळा सभापती बाबुराव वायकर व मावळ तालुका राष्ट्रवादी काँगेसचे कार्याध्यक्ष दिपक हुलावळे यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी, सरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच विठ्ठल मोहिते, माजी उपसरपंच दत्तात्रय शिंदे,रामभाऊ शिंदे,संध्या शेळके, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे, गणेश बोऱ्हाडे, संदीप शिंदे, श्रुती मोहिते, वर्षा नवघणे, आरती आगळमे, मिनाक्षी आगळमे, आम्रपाली मोरे, तानाजी पडवळ, विशाल वहिले, सुनील दंडेल, गणेश ढोरे, सुहास वायकर, अॅड अक्षय रौंधळ, सोनू पिंजन, अभि ढोरे, सुनील शिंदे, उमेश शिंदे, प्रदीप शिंदे, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासकामांचा उदघाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ग्रामस्थांनी सभापती वायकर यांची ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढली. साते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद फंडातून आज पर्यंत सुमारे 6 कोटी 50 लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली. अशी माहिती यावेळी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी ग्रामस्थांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.